ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय जनता पक्षास डावलून कोणत्याही गटास बिद्री कारखान्याच्या निवडणूकीत यशस्वी होता येणार नाही : राजे समरजीतसिंह घाटगे

 प्रतिनिधी : विजय मोरबाळे

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे.बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील चारही तालुक्यात भाजपची चांगली ताकद आहे.त्यामुळे भारतीय जनता पक्षास डावलून कोणत्याही गटास या निवडणूकित यशस्वी होता येणार नाही.जिल्हा पातळीवरील याआधीच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा अनुभव जमेस धरून यावेळी भाजप म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकसंघपणे ताकदीने या निवडणुकीत सामोरे जाऊया. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कागल येथे दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या नियोजनासाठी भाजपच्या वतीने मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजे समरजितसिंह घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर या चार तालुक्यातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांची प्राथमिक नियोजन बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

घाटगे पुढे म्हणाले, स्वाभिमान गहाण ठेवून सभासद व कार्यकर्त्यांना कोणाच्याही दावणीला बांधले जाणार नाही. ही निवडणूक आपल्याला केवळ लढवायची नाही तर चांगल्या पद्धतीने जिंकायची आहे. त्यासाठी सर्वांनी एक संघपण या निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी सज्ज राहूया.

बिद्रीचे माजी संचालक बाबासाहेब पाटील म्हणाले म्हणाले, चार विधानसभा मतदारसंघावर प्रभाव असलेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत गतवेळी भाजपला ताकती पेक्षा कमी जागा मिळाल्या. अशी खंत सर्वच कार्यकर्त्यांना आहे. याची कसर या निवडणुकीत नेते मंडळी भरून काढतील.

कोल्हापूर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई म्हणाले,नैसर्गिक आपत्तीच्या कारणामुळे स्थगित झालेली ही निवडणूक प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते.त्यासाठी निवडणुकीच्या तयारीसाठी तालुकावार सभासद व शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क दौरे सुरु करावेत.
गोकुळचे माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील म्हणाले वरिष्ठ नेते मंडळी जो निर्णय घेतील त्याच्याशी सर्वजण ठाम राहू या. केंद्रात व राज्यातील सत्तेच्या माध्यमातून जास्तीत जागा पदरात पाडून घेण्यासाठी नेते मंडळींनी प्रयत्न करावेत.

व्यासपिठावर प्रकाश कुलकर्णी,धोंडीराम मगदूम,देवराज बार्देस्कर,दत्तामामा खराडे,वसंतराव पाटील उपस्थित होते.

यावेळी संघटन मंत्री नाथाजी पाटील,सुनिलराज सुर्यवंशी ,प्रताप पाटील कावणेकर,प्रदीप पाटील,अनिल तळकर,यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत संजय पाटील यांनी केले.आभार सुमित चौगुले यांनी मानले.

स्व. विक्रमसिंहराजेंनी बिद्रीला दिशा दिली…..

यावेळी सुनीलराज सूर्यवंशी म्हणाले सहकारमहर्षी स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सहकारातील अनुभवाचा बिद्री साखर कारखान्याला अनेक वेळा फायदा झाला.अनेक निवडणूकीत व कामकाजात त्यांनी योग्य दिशा दाखविण्याचे काम केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks