ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मोठी बातमी ! सचिन वाझे पोलीस दलातून निलंबित

मुंबई प्रतिनिधी :
मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे निलंबन करण्यात आले आहे.वाझे यांना शनिवारी रात्री NIA कडून अटक करण्यात आली होती. तर आता NIA कडून वाझे यांना PPE किट घालून क्राइम सीन रिक्रिएट करण्यात येणार आहे.
25 फेब्रुवारीला एक व्यक्ती पीपीई किट घालून जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले होते. तोच व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ विस्फोटकांनी भरलेल्या कारजवळून जात असल्याचे दिसले.
त्यामुळे आता एनआयएला संशय आहे की, हाच तोच व्यक्ती आहे ज्याने अंबानींच्या घराजवळ स्कॉर्पिओ उभी केली होती.
–