आजरा : हंदेवाडीचे सुपुत्र लेफ्टनंट निखिल कदम यांचा सत्कार

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
हंदेवाडी ता.आजरा येथील सुपुत्र निखिल शंकर कदम यांची भारतीय सैन्य दलात बॉम्बे इंजिनिअरिंग कोअर मध्ये लेफ्टनंटपदी निवड झालेबद्दल ग्रामस्थांच्या वतीने प्राचार्य डॉ एस एम कदम यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला यानंतर आजोबा अर्जुन घेवडे व आजी तसेच ब्रम्हा विकास मंडळ मुंबई,ब्रम्हा हनुमान ट्रस्ट हंदेवाडी तसेच नातेवाईक , मित्रपरिवार ,आजी माजी सैनिक संघटना ,स्वराज्य मंडळ ,कदम परिवार व मान्यवर या सर्वांनी लेफ्टनंट निखीलजी यांचा सत्कार केला
यानंतर मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ एस एम कदम म्हणाले की निखिल ची लेफ्टनंट पदी निवड म्हणजे गावच्या वतीने भूषणावह गोष्ट असून त्याने मोठ्या पदावरून सेवानिवृत्त व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून युवकांनी निखिल चा आदर्श घ्यावा असे सांगितले तर माजी प्राचार्य डॉ एम डी कदम यांनीही निखिल चे कौतुक केले
यावेळी बोलताना लेफ्टनंट निखिल कदम म्हणाले की युवकांनी आपल्या अंगी जिद्द,मेहनत ठेवून स्पर्धा परीक्षा द्याव्यात यशश्री आपल्याला खेचून आणता येईल मला या साठी आई वडील व चुलते सर्वांचे सहकार्य लाभले असे त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी मारुती कळविकट्टीकर, मॅनेजर जनार्दन बामणे,मधु हेब्बाळकर,पत्रकार पुंडलिक सुतार,उपसरपंच सदाशिव हेब्बाळकर,अर्जुन दळवी ,शिवाजी जाधव व मान्यवर उपस्थित होते