निढोरी येथील श्री.भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने सभासदांना दिवाळीनिमित्त ९% लाभांश वाटप

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
निढोरी ता.कागल येथील श्री.भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने सभासदांना सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी दिवाळीनिमित्त ९% लाभांश वाटप करण्यात आला.
ही संस्था सातत्याने लाभांश वाटप करून सभासदांच्या विश्वास पात्र ठरली आहे. संस्थेचे संस्थापक कै.शंकरराव पाटील आण्णा यांनी १९४९ साली स्थापन केलेल्या संस्थेची अतिशय उत्कृष्ट कार्यभार करून के.डी.सी.सी बँक पातळीवर चांगली संस्था म्हणून गणली जाते. संस्थेने या वेळी के.डी.सी.सी बँक ग्राहकांना मायक्रो ATM सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
यावेळी चेअरमन मा.केशवकाका पाटील यांनी संस्थेच्या दैदिप्यमान कामगिरी बद्दल व कर्जदार सभासद यांच्या जोरावर संस्थेच्या चढता आलेख बाबत माहिती दिली.यावेळी प्रमुख उपस्थितीत व्हा.चेअरमन सर्जेराव मगदूम, मा.शशिकांत पाटील, सरपंच अमित पाटील , वसंतभाऊ पाटील,डाॅ.भिकाजी मोरबाळे,संजय पाटील,बापूसो चौगले, दिलीप पाटील , बाळासाहेब टोणके-पाटील, विकास पाटील, भैरवनाथ कळमकर, तुषार पाटील, तुकाराम कळमकर, बाबुराव पाटील, राजाराम पाटील, बंडोपंत कांबळे, विलास कोळी, भैरवनाथ कोरे, शशिकांत सुतार सर, आनंदा शेटके,मा.बहीरशेठ , सचिव नारायण आगंज, क्लार्क शिवाजी तापेकर, अनिल भराडे, इत्यादी सभासद उपस्थित होते .