विकासाची गंगा उत्तुरकरांच्या दारापर्यंत पोहचविणार : राजे समर्जीतसिंह घाटगे

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
उत्तूर विभाग हा कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाल्यानंतर उत्तूर विभागाकडे लोकप्रतिनीधिनी विकास कामामध्ये दुर्लक्ष केलेची भावना येथील नागरिकांमध्ये आहे. विकास कामासाठी येथील नागरिकांना नेत्यांचे दारात चकरा माराव्या लागतात.याला फाटा देऊन उत्तूर विभागाचा सर्वांगीण विकासासाठी ” समरजितसिंह आपल्या दारी चला पोहचवूया स्व.राजेंचे विचार घरोघरी ” या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून विकासाची गंगा उत्तुरकरांच्या दारातपर्यंत पोहचविणार अशी ग्वाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त चला संकल्प करुया ७५ हजार लाभार्यांना लाभ देऊया उपक्रमांतर्गत समरजितसिंह आपल्या दारी अभियानाच्या शुभारंभवेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनेतून लाभ मिळवलेल्या लाभार्थ्यांच्या घरी भेटी देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला.विविध लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटपही केले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
ते पुढे म्हणाले, शासन आपले दारी उपक्रमातून उत्तूर विभागातील तीन हजार हून अधिक तर फक्त उत्तूर गावातील 500 हून अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित असलेल्या उत्तुर विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे झटत आहोत. सन 2017 मध्ये वीस वर्षे रखडलेल्या आंबेओहोळ धरणासाठी 227 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. आमच्या विविध विकास कामांचा प्रारंभ त्यामधे आरोग्य शिबीर असो,शासन आपल्या दारी किंवा जातीच्या दाखल्यासाठीचे शिबीर असो, विविध उपक्रमांचा प्रारंभ आम्ही जाणीवपूर्वक उत्तूर विभागातूनच केला आहे. शासनाच्या योजनांपासून वंचित लोकांनी नेत्यांच्या दारात जायचे नाही तर नेत्यांनीच सेवक म्हणून लाभार्थी च्या दरात गेले पाहिजे ,यातूनच राज्यात सर्वप्रथम समरजितसिंह आपल्या दारी अभिनव उपक्रम राबविला आहे.
यावेळी अतिशकुमार देसाई म्हणाले, शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे त्यांना गुरुस्थानी मानून त्यांच्यास कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजे समरजितसिंह घाटगे कार्यरत आहेत .त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकसेवक म्हणून काम करण्याची संधी देऊ या.
यावेळी विठ्ठल उत्तूरकर, सुजाता मुळीक,गणपती जाधव,सुनंदा उत्तूरकर, तेजस्वीनी बामणे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य संदेश रायकर, सुशांत अमनगी, सविता सावंत, प्रदीप लोकरे, धोंडीराम सावंत, बाळासाहेब सावंत, प्रदीप लोकरे, सुजित कुराडे ,प्रशांत जवाहिरे प्रशांत पोतदार आदी उपस्थित होते.
स्वागत मंदार हळवणकर यांनी केले प्रास्तविक भास्कर भाईंगडे यांनी केले. आभार प्रदीप लोकरे यांनी मानले
सौर कृषीऊर्जा प्रकल्पासाठी प्रयत्नशील….
उत्तूर येथे ग्रामपंचायतीत आमची सत्ता नाही. परंतु येथील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी सौर कृषी ऊर्जा प्रकल्प योजनेतून दिवसा वीज मिळवून देण्यासाठीचा माझा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही घेतली आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे येथील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल असे श्री घाटगे यांनी सांगितले.