ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडची श्री व्यापारी नागरी सह .पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत ; सभासदांना १३ टक्के लाभांश देण्याची घोषणा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड ता . कागल येथिल रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारी व राष्ट्रीय ” आदर्श पतसंस्था ” पुरस्कार मिळवलेली श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुरगूडच्या श्री . लक्ष्मी -नारायण नागरी सह . पतसंस्थेच्या सभागृहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .

लक्ष्मी नारायण प्रतिमेचे पूजन श्री . तानाजी नाधवडेकर ( सुरुपली ) , बाळासो चांदेकर ( मुरगूड ) , आनंदा खराडे ( शिंदेवाडी ) यांच्या हस्ते तर,दिपप्रज्वलन श्री . उदय मगदूम ( मुरगूड ) , सुनिल सोनार ( मडिलगे बु॥ ) , व इतर मान्यवर सभासदांच्या हस्ते पार पडले .यानंतर संस्थेचे मयत संचालिका कै . संगिता नेसरीकर यांच्यासह दिवंगत सभासदानां श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .

अध्यक्षीय भाषणात चेअरमन किरण गवाणकर म्हणाले संस्थेस १५ लाख३७ हजारावर निव्वळ नफा झाला आहे .सभासदानां१३ टक्के लाभांश देण्यात येणार असून संस्था ही प्रगतीपथाच्या दिशेने वाटचाल करीत आहे .

यावेळी आपल्या प्रास्ताविकात संस्थापक संचालक श्री . प्रशांत शहा म्हणाले अहवाल सालात१७ कोटी३३ लाख२९ हजारावर ठेवी , तर ठेवीची गुंतवणूक ५ कोटी९४ लाख६७ हजारावर केली असून खेळते भांडवल२० कोटी६७ लाख५० हजार, तर १३ कोटी३९ लाख ९३ हजार कर्जवाटप केले असून ७ कोटी ८४ लाख७६ हजार हे सोने तारणावरील सुरक्षित कर्ज आहे .

पुढील काळामध्ये बाजारपेठेतील स्वमालकीची असणारी संस्थेची इमारत आरसीसी व सुसज्य अशी बांधण्यास आम्ही प्रयत्नशिल आहोत ते पुढे म्हणाले संस्थेचे सर्व कार्यक्षम संचालक , तत्पर कर्मचारी वर्ग यामुळे व्यापारी नागरी पतसंस्थेचे हे रोपटे वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी काटकसरीने प्रयत्नशील आहोत .

यावेळी १०वीच्या गुणवत्ता धारक विद्यार्थी कु . समृद्धी सुशांत गवाणकर , कु . यश आमित भोई , राजनंदिनी संतोष कल्याणकर व१२वीचे गुणवत्ता धारक विद्यार्थी कु . राजवर्धन जयशिंग पाटील, कु . नेहा चंद्रकांत कुभोजे यांचा सत्कार व बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

अहवाल वाचन संस्थेचे मॅनेजर श्री . सुदर्शन हुंडेकर यानीं केले . यावेळी रमेश सावंत , राजू कुडवे , नवनाथ डवरी , श्रीकांत खोपडे , शिवाजी खंडागळे , दत्तात्रय तांबट , स्मिता भिलवडीकर यानीं चर्चेत सहभाग घेतला .सभेतील सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले .

सुत्रसंचलन श्री . चंद्रकांत माळवदे ( सर ) यानी केले तर आभार व्हा . चेअरमन श्री . प्रकाश सणगर यानीं मानले .या सभेसाठी संचालक सर्वश्री सातापा पाटील , किशोर पोतदार , हाजी धोंडीबा मकानदार , शशिकांत दरेकर , नामदेवराव पाटील , प्रदिप वेसणेकर , निवास कदम , संदिप कांबळे , संचालिका -सौ . रोहिणी तांबट , सौ . सुनंदा जाधव , कर्मचारी वर्ग , सभासद उपस्थित होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks