ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना बेताल वक्तव्य करणं भोवलं ; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना बेताल वक्तव्य करणं भोवलं आहे. इंदोरीकर महाराजांनी किर्तनातून लिंगभेदावर भाष्य केलं होतं. सम आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा आणि मुलगी होत असल्याचं इंदोरीकर महाराज म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने छत्रपती संभाजीनगर न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. अखेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याबाबत मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढणार आहेत. 

इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश छत्रपती संभाजीनगर कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होणार असून इंदोरीकर महाराज यांच्या अडचणीत चांगली वाढ झाली आहे. इंदोरीकर महाराज यांनी लिंगभेदाबाबत विधान केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने त्यांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती. कनिष्ठ न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. हा गुन्हा रद्द करावा म्हणून इंदोरीकर महाराज यांनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. 

 सेशन कोर्टाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला होता. त्यानंतर हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर खंडपीठात गेलं. त्यावर सुनावणी झाली असता कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता खंडपीठाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, अशी प्रतिक्रिया याचिकर्त्यांचे वकील जितेंद्र पाटील यांनी सांगितलं.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks