नवोदय परीक्षेत यश क्लासेसच्या ०९ विद्यार्थ्यांची निवड

कडगाव : समीर मकानदार
जवाहर नवोदय विद्यालय यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सन २०२१ इ.सहावी प्रवेश परीक्षेत यश क्लासेस कडगाव (ता.भुदरगड) येथील तब्बल 9 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यश क्लासेसचा इतका उच्चांकी निकाल लागल्यामुळे मार्गदर्शक सुशांत देसाई सर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे- यशोदिप श्रीकांत देसाई, वरद सचिन खराडे, अथर्व निशांत डावरे, राजवीर संदीप पाटील, आदर्श शिवाजी पाटील, प्रणव लहू दहीफळे, श्रेया दिगंबर पाटील, वैभवी प्रकाश वाडकर, पृथ्वीराज अमरसिंह पाटील आदी विद्यार्थी यशाचे मानकरी ठरले.
सुशांत देसाई यांचे ‘यश क्लासेस’ म्हणजे भुदरगड़ तालुक्यातील शालेय स्पर्धा परीक्षांचे एक दर्जेदार, विश्वसनीय ज्ञानदालन म्हणून ओळखले जाते. नवोदय, स्कॉलरशिप व सैनिक स्कूल सातारा या परीक्षांचा उच्चांकी निकाल देणारा एकमेव क्लास म्हणून यश क्लासेसचे नावलौकिक आहे. मर्यादित विद्यार्थी संख्या आणि सर्वोच्च निकाल हे ब्रीद सुशांत देसाई यांनी जोपासले आहे. सांगली, सातारा, कराड, सिंधुदुर्ग, व कोल्हापुर अशा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधून अनेक विद्यार्थी यश क्लासेसमध्ये प्रवेश घेवून उच्चांकी निकालाने दरवर्षी यशस्वी होतात.
शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा महत्वाचा घटक आहे. भविष्यातले डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, विचारवंत, कलाकार, लेखक, तत्वज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्यापद्धतीने मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे देसाई सर बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित आहेत. विद्यार्थी हा शिक्षकाकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. विद्यार्थ्यांचे विचार, मत, आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो.
जवाहर नवोदय विद्यालयासारख्या उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षेत तब्बल ०९ विद्यार्थ्यानी यश संपादन केल्यामुळे मार्गदर्शक देसाई सरांचे महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना सुशांत देसाई, सिद्धी सुशांत देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.