महा महिला बचत गट निधी लिमिटेड आयोजित हळदीकुंकू व आर्थिक नियोजन प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न; नवीन महिला सभासदांना पैठणी साडी वाटप.

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके

महा महिला बचत गट निधी लिमिटेड व ग्रामपंचायत बिद्री यांच्या वतीने हळदीकुंकू व आर्थिक नियोजन प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन केले होते. यावेळी बोलत असताना , महा महिला बचत गट निधी लिमिटेड च्या मॅनेजर अंकिता चौगुले म्हणाल्या, माता-भगिनीना आर्थिक उन्नतीसाठी महा महिला बचत गट निधी लिमिटेडचे चेअरमन डॉ निवेदीता येडूरे व संचालक मंडळ परिश्रम घेत महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तरी निधीचा योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा. तसेच यावेळी महा महिला निधी लिमिटेडच्या प्रतिनिधी रक्षंदा सुतार,ऐश्वर्या साळोखे,सोनाली धोंड,प्रवीण कांबळे ,शिल्पा सरर्नोबत यांनी निधी लिमिटेडच्या योजनेची माहिती दिली. तसेच यावेळी ग्रामपंचायत बिद्री चे सरपंच श्रीमती आनंदी पाटील,म्हणाल्या महा महिला निधी लिमिटेडच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे अभियान उभे केले आहे, याचा सर्वांनी उपभोग घ्यावा असे प्रतिपादन केले. यावेळी महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच महा महिला निधी लिमिटेड कडून शेकडो महिलांना येवला पैठणी साडी वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत बिद्री चे सरपंच श्रीमती आनंदी पाटील,उपसरपंच सौ शितल गायकवाड व महिला निधी लिमिटेडचे स्टाफ रक्षंदा सुतार,ऐश्वर्या साळोखे,सोनाली धोंड,प्रवीण कांबळे ,बाळकृष्ण कांबळे व महिला वर्ग उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताजीराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार शिल्पा सरर्नोबत यांनी मानले.