ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापूरच्या करमाळा तालुक्यात मनोज जरांगे यांची सभा ; तब्बल 125 एकरात सभेचे नियोजन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, या दरम्यान 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी म्हणजेच उद्या (15 नोव्हेंबर) सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होत आहे.

तर, तब्बल 125 एकर शेतात या सभेचं नियोजन करण्यात येत आहे. तसेच, सकल मराठा समाजाच्या वतीने या सभेची तयारी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज सभास्थळाची पाहणी करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात वांगी नंबर 1 या ठिकाणी मनोज जरांगे पाटिल यांची उद्या तोफ धडाडणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. तर, तब्बल 125 एकर शेतात होणाऱ्या या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. सभेच्या ठिकाणी मराठा बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची, रुग्णवाहिका आणि डॉक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

उजनी जलाशयाच्या नैसर्गिक सानिध्यात आयोजित करण्यात आलेली ही सभा संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. तर, उद्या होणाऱ्या या सभेची सकल मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांकडून आणि आयोजकांकडून आज पाहणी करण्यात आली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks