मोठी बातमी : कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा मार्चअखेर सुरू हाेणार

काेल्हापूरहून तिरुपतीला जाणारी विमानसेवा बंद ठेवल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली हाेती (march). ही सेवा पुन्हा सुरु करा अशी भाविकांची मागणी हाेती. गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. येत्या 31 मार्चपासून कोल्हापूर तिरुपती विमान सेवा सुरू करण्याचे संकेत विमानतळ प्राधिकरणाने आज (बुधवार) एक्सवर माहिती पाेस्ट करुन दिले आहेत.
कोल्हापूरहून तिरुपती येथे जाण्यासाठी रेल्वे आणि विमानसेवा उपलब्ध हाेती (march). त्यातील विमानसेवा विशेषत: सातारा, सांगली आणि काेल्हापूर येथील भाविकांसाठी विमानसेवा फायदेशिर ठरत हाेती. काेल्हापूरहून तिरुपतीला जाणारी विमानसेवा तीन महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली. यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली हाेती. ही सेवा पुन्हा सुरु व्हावी यासाठी भाविकांनी लाेकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी केली हाेती.
दरम्यान आज एक्सवर विमानतळ प्राधिकरणाने कोल्हापूर – तिरुपती विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत. येत्या 31 मार्चपासून कोल्हापूर तिरुपती विमान सेवा सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ही सेवा रविवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी असेल. एक्सवर दिलेल्या माहितीनूसार विमान सकाळी अकरा वाजून दहा मिनीटांनी काेल्हापूरहून तिरुपतीला सुटेल. तसेच तिरुपतीहून काेल्हापूरसाठी दुपारी 12 वाजून 35 मिनीटांनी विमान असेल याची भाविकांनी नाेंद घ्यावी.