ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी ! वर्ल्ड कपसाठी भारतात येणार पाक क्रिकेट संघ, विदेश मंत्रालयाचा निर्णय

पाकिस्तान सरकारने पाकिस्तान संघाला खेळण्यासाठी भारतात येण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान राजकीय संबंध चांगले नसल्याने दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत.

भारत आणि पाक या दोन क्रिकेट संघांचा आमना-सामना केवळ आशिया चषकासारख्या स्पर्धांमध्येच होत असतो. इतकेच नाही तर हे दोन संघ भारत-पाकिस्तान दौरे देखील करत नाहीत.याच कारणामुळे आशिया चषक २०२३ चे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद सांभाळणार आहे.

मात्र, टीम इंडियाने सुरक्षेच्या कारणांसाठी पाकिस्तानाला जाण्यास नकार दिला. भारतीय संघ आपले सामने श्रीलंकेत खेळेल. अंतिम सामना देखील श्रीलंकेतच होईल. भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी भारतात येण्याबाबत कठोर भूमिका घेतली होती. सरकारने अनुमती दिल्यानंतर पाकिस्तानचा संघाला भारतात पाठवले जाईल, असे त्यांचे म्हणणे होते.

शहबाज शरीफ सरकारने गेल्या राही दिवसांपूर्वी यासाठीच एक समिती स्थापन केली होती. तथापि, आता पाक सरकारला आता भारतापुढे झुकावे लागले. काय म्हणाले पाकिस्तान?खेळाला राजकारणाशी जोडले जाऊ नये असे पाकिस्तानने वेळोवेळी म्हटले आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याच कारणामुळे त्यांनी आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाला भारतात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानला आपल्या संघाच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना देईल असे मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, भारतात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंना पूर्ण सुरक्षा पुरवली जाईल अशी आशा आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks