आजरा : कोळिंद्रे येथे राम नामा चा जप

आजरा प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
कोळिंद्रे ता.आजरा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नूल मठाचे पिताश्री यादव रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली राम नामा चा जप करण्यात आला यानंतर राधा कृष्ण भजन,गवळणी ,भारुड ,रिंगण,
निवेदन असे कार्यक्रमा चे स्वरूप होते.यावेळी सुनीता गुरव यांनी गायन केले.
शाहीर मारुती केसरकर यांनी शाहिरी गीतांचे गायन केले तर प्रा.प्रकाश शिंदे यांनी भारुडी भजन सादर केले तर रागिणी मुगळे यांनीही कला सादर केली.कार्यक्रमात हार्मोनियम साथ मारुती पाटोळे यांनी केली तर बाजीराव पोवार यांनी ढोलकी साथ दिली.गावा गावात व प्रत्येक घरात राम नामा चा जप व्हावा,यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पुढील वर्षी सामान्य गरीब लोकांना अयोध्या, मथुरा,काशी,प्रयागराज आदी ठिकाणी इच्छुक भाविकांना मोफत दर्शनासाठी घेऊन जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भजनी मंडळे आली होती.