ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
धैर्यशील पाटील कौलवकर केडीसीसी बॕकेच्या रणांगणात

कौलव प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे आज फाॕर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक इच्छुकांनी फाॕर्म भरले.यामध्ये भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकरांनी पाणी संस्था ,दुध संस्था ,गटातुन आणि त्यांच्या पत्नी रुपालीदेवी धैर्यशील पाटील कौलवकर यांचा महिला राखीव गटातुन फाॕर्म भरला.यावेळी रघुनाथ पाटील,तानाजी ढोकरे,विश्वास पाटील,भगवान वरुटे,संजय डोंगळे शहाजी पाटील रणजीत पाटील ,यशवंत पाटील कौलवकर,दिग्वीजय पाटील कौलवकर,यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.