सानिका स्पोर्ट्स गरीब विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कायम ठामपणे उभा : दगडू शेणवी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गरीब ,गरजू ,हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य फी संदर्भात जर काही अडचणी येत असतील तर मुरगुड येथील सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन ठामपणे उभा आहे. विद्यार्थ्यांनी निसंकोचपणे आपल्या अडचणी मंडळाच्या कार्यकर्त्याजवळ व्यक्त केल्यास त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल .मदतीचा हात सदैव पुढे राहील. असे प्रतिपादन सानिका स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुरगुड चे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी केले.ते मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड येथील अकरावी बारावी च्या वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना शालेय साहित्य वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले होते.स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य एस पी पाटील यांनी केले. यावेळी उप मुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी, मेजर राजेंद्र सावंत, राजू चव्हाण, पी एस पाटील टी आर शेळके यूपी कांबळे एस एस पाटील यांची मनोगते झाली.
कार्यक्रमास एम.डी .खटांगळे, ए. एस .मांगोरे एम.ए .बसर्गे जे.टी. पवार ,व्ही.आर गडकरी ,टी एस पाटील ,अजित सावंत आदी मान्यवर उपस्थित होते आभार एम. एम .कांबळे यांनी मांनले.