राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय शिथिल करावा ; विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे समरजितसिंह घाटगे यांची मागणी

कागल प्रतिनिधी .
राज्य सरकारने लॉकडाऊन बाबत घेतलेला निर्णयाबद्दल सर्वसामान्य जनता व व्यापार्यांच्यातून असंतोष निर्माण झाला आहे. शिवाय याबाबत संभ्रमावस्था आहे.सरकारने व्यापार्यांना नियम, अटी घालून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. याबाबत तात्काळ निर्णय न झाल्यास व्यापाऱ्यांचा उद्रेक होईल.राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय शिथिल करावा आपण स्वतः लक्ष घालावे.अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली .
मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी श्री घाटगे यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी चर्चा करताना श्री. घाटगे म्हणाले,
लॉकडाऊन शक्यतेमुळे शेतकऱ्यांबरोबर कामगार, शेतमजूर, छोटे उद्योजक, कारागिर, बारा बलुतेदार व राज्यातील हातावर पोट भरणारा कामगार वर्ग, झोपडपट्टीमध्ये राहणारी जनता, कलावंत हातावर पोट असणारा वर्ग आता पुन्हा लॉकडाऊन लागला तर काय करायचं या चिंतेत आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊन ऐवजी इतर उपाययोजना वाढवून कोरोना प्रतिबंधाचे काम करावे अन्यथा लॉकडाऊन काळात या वर्गाला आर्थिक सहकार्य करावे, यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती राज्याचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांना भेट घेवून केली.
सध्या परिस्थिती गंभीर बनली असून याकडे लक्ष दिले नाही तर लोकं रस्त्यावर उतरतील. मागील १ वर्षाचा कोविडचा काळ पाहता राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेत बदल करावयास हवा होता डॉक्टर, परिचारीका, व्हेंटीलेटर बेडस्, हॉस्पीटल इत्यादीच्या संख्येत वाढ करने अत्यावश्यक होते.
लॉकडाऊन लावण्याची वेळ येणे हे शासनाचे अपयश आहे.
शनिवार, रविवारचा अल्टीमेट सोडून इतर दिवशी दुकाने सुरू करण्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी व्यापारी व सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
शंभर टक्के लॉक डाऊन झाले तर छोट्या छोट्या धंदेवाल्यांचे फार मोठे नुकसान होणार असून सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होणार आहेत.
तरी सर्वसामान्यांच्या या प्रश्नात आपण स्वतः लक्ष घालावे. अशी मागणी त्यांनी केली.