ताज्या बातम्यामहाराष्ट्र
संभाजी भिडेंविरोधात विधानसभेत विरोधक आक्रमक, भिडेंना अटक करण्याची मागणी

महात्मा गांधीसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याविरोधात संभाजी भिडेंविरोधात सध्या राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे.
संभाजी भिडेंच्या अटकेसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ सुरू आहे.संभाजी भिडेंविरोधात विधानसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. सभागृहात भिडे यांना अटक करण्याची मागणी होत आहे.
काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेतच संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर भिडे यांना असेल तिथून उचलून अटक केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.