अन्नपूर्णा’ शुगर कारखान्याला लागेल ते सहकार्य करणार ः आमदार हसन मुश्रीफ ; केनवडे अन्नपुर्णाच्या दुसऱ्या गळीत हंगामाला मोठ्या उत्साहात प्रारंभ , अडीच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या श्री अन्नपूर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याला लागेल ते सहकार्य करणार, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची जिद्द, चिकाटी आणि अपार परिश्रमाच्या जोरावर हा कारखाना दुसऱ्या गळीत हंगामात अडीच लाखाहून अधिक टणांचे गाळप यशस्वीपणे करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अन्नपुर्णाचे चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य अरूणराव इंगवले, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे , जि.प.मा.अध्यक्ष राहूल पाटील, गोकुळ संचालक अंबरिषसिंह घाटगे, एम.एस.पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक भैया माने प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी अन्नपुर्णा शुगर कारखान्याचा द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ गव्हाणी,मुळी पुजन आमदार,माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते झाले. अन्नपुर्णा माता,गणेश मुर्ती प्रतिष्ठापणा परमात्मराज आडी देवस्थानचे मठाधीपती प.पू.राजीवजी महाराज यांचे हस्ते व सत्यनारायण पुजा मल्हारी पाटील यांचे हस्ते सपत्नीक करण्यात आली.
संजयबाबा घाटगे म्हणाले, आमदार मुश्रीफ यांच्यामुळे आजचा अन्नपुर्णा शुगरचा सुवर्णक्षणांचा दिवस पहावयास मिळत आहे. कारखान्यास जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून आमदार मुश्रीफ यांनी मोलाची मदत केली.अन्नपूर्णा साखर कारखाना हे शेतकऱ्यांच्या प्रखर इच्छाशक्ती व जिद्दीचे प्रतीक आहे. रक्त आटवून राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या श्रमाचे हे मंदिर आहे. प्रतिदिन 1600 मेट्रीक टन गाळप करणार असून सुमारे अडीच लाख टनाचे गाळप उदिष्ठ ठेवले आहे. 20 अक्टोंबर पर्यंत गुळ पावडर व त्यानंतर गुळ व साखर उत्पादन सुरू होईल. हा कारखाना या हंगामातही प्रस्थापित कारखान्यांच्या जवळपासच दर देईल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमास गोकुळच्या माजी.संचालिका सौ.अरूंधती घाटगे, माजी जि.प.सदस्या सौ.सुयशा घाटगे, जि.प.सदस्य,मनोज फराकटे,बाळासाहेब तुरंबे, दत्ता पाटील, संचालक शिवशिंग घाटगे,धनराज घाटगे,राजू भराडे , विश्वास दिंडोर्ले, चिफ इंजिनिअर शिवाजी शेवडे, चिफ केमिष्ठ प्रकाशकुमार माने, चिफ अकाउंटट शामराव चौगले, शेती अधिकारी बी.एम.चौगले, कृष्णात कदम,विष्णू पाटील,आकाराम बचाटे, सुरेश मर्दाने,साताप्पा तांबेकर, उत्तम वाडकर,बाजीराव पाटील,विश्वास पाटील,उमाजी पाटील,किरण पाटील,भैरू कोराणे,अशोक पाटील, ज्ञानदेव पाटील पंचक्रोशीतील श्री घाटगे व मुश्रीफ गटाचे बहुसंख्य कार्यकर्ते,शेतकरी, सभासद उपस्थीत होते.
स्वागत गोकुळ संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी केले. सुत्रसंचलन सुभाष पाटील,रमेश जाधव यांनी केले तर आभार संचालक दत्तोपंत वालावलकर यांनी मानले.
“तेरा साथ ना छोडेंगे………..”
भाषणात आमदार श्री. मुश्रीफ यांनी संजयबाबा आपले कॉलेजपासूनचे मित्र असल्याचे आवर्जून सांगितले. वैचारिक मतभेदांवर संजयबाबा आणि मी ३० -३५ वर्षे एकमेकांच्या विरोधात लढत राहिलो. आत्ता आम्हा दोघांनीही काय मिळवायचं राहिलय? असा सवाल करीत ते म्हणाले, गोरगरीब जनतेच्या चांगल्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. भाषणाच्या शेवटी शोले चित्रपटातील गाण्याची आठवण करून देत श्री. मुश्रीफ म्हणाले, ये दोसती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर………तेरा साथ ना छोडेंगे…….!”