ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“लोकमान्य टिळक पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा कारण…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं

महारष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो, नरेंद्र मोदींनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. लोकमान्य टिळक पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत येण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. पुणे ही टिळक, फुले, चाफेकर या वीरांची भूमी आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार स्विकारताना मला आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

टिळक पुरस्काराने माझी जबाबादारी वाढली

यावेळी त्यांचं स्वागत पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि भेट देऊन करण्यात आलं. मोदींनीही यावेळी मराठीतून जनसागराशी संवाद साधत कार्यक्रमात अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. मोदी म्हणाले, हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे. एखादा पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा जबाबादारी देखील वाढते. हा पुरस्कार मी 140 कोटी देशवासीयांना समर्पीत करतो.

टिळक पुरस्काराचा निधी नमामि गंगेला देण्याचा निर्णय

ज्यांच्या नावात साक्षात गंगा नदीचे नाव आहे. अशा पुरस्काराची रक्कम मी नमामि गंगा या प्रोजेक्टला देण्याचा निर्णय घेतला आहे. देशात पुणे आणि काशीला विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला वेगळे वळण दिले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks