अंबाबाई मंदिर परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो नाहक त्रास ..

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर येथील अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातुनच नाही तर देशभरातून भाविक दर्शना साठी येत असतात. त्यामुळेच बारा महिने कोल्हापूर मध्ये भाविकांची गर्दी असते.
अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी भरपूर यात्री निवास आहेत परंतु या यात्री निवासना पार्कींगची सोय नाही त्यामुळे अंबाबाई मंदिर परिसरात राहत असलेल्या नागरिकांच्या दारातच पार्कींग करणेस यात्री निवास मालक यांचे कडून कोण नसलेले बघून सांगितले जाते. असा अनुभव भागातील लोकांना सांगितला. प्रसंगी वादावादीचे प्रकार दररोज घडत आहेत.
परिसरातील नागरिकांचे एकच म्हणने आहे की, भाविक दर्शना साठी येतात पण पार्कींगच्या ठिकाणी गाड्या पार्कींग करून सहकार्य करावे एवढीच अपेक्षा..
यात्री निवासचे एजंट 100/- , 200/- साठी जागा दिसेल तिथे भाविकांच्या गाड्या पार्कींग करून घेतात आणि स्वतः गायप होतात. अशा वेळी ज्याच्या दारात गाडी पार्कींग केलेली असते तो व्यक्ती आणि भाविक यांच्यात वादावादी निर्माण होते. पार्किंग मध्ये असणारे फेरीवाले सुद्धा गाडी पार्किंग करायचे पैसे मागतात आणि वादावादी चे प्रकार घडतात, उर्मिला टॉकीज जवळचे पार्किंग बंद असले मुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
स्वतःची गाडी स्वतःच्या पार्कींग मधुन बाहेर काढताना घाबरतोय आम्ही…..
माझी स्वतःची गाडी आहे, पार्कींग पण स्वतःचे आहे. कुठे जायचं म्हणून गाडी बाहेर काढली तर दुसऱ्या मिनिटात त्याठिकाणी कोणी ना कोणी पार्कींग करत असत. माझी गाडी रस्त्यावर लाऊन घरी जायचं म्हटलं तर ट्रॅफिक जाम होतंय. तो व्यक्ती निवांत फिरून येई पर्यंत आम्ही वाट बघत दारात उभे राहायच मग ती गाडी बाहेर निघल्यावर माझी गाडी पार्किंग करायची. ही रोजचीच अवस्था आहे..म्हणजे आम्ही गाडी बाहेर काढायचीच नाही का ??
-अंबाबाई परिसरातील एक नागरिक
ज्याप्रमाणे भाविकांची इतर सोय अत्यंत चांगल्या पद्धतीने केली जाते तशीच पार्कींग साठी सुद्धा महानगरपालिका आणि देवस्थान कमिटी यांनी हि बाब लक्षात घेऊन सोय करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधुन होत आहे.