ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जे. जे. रुग्णालयात यकृत रोपन सुविधा उपलब्ध करुन देणार : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात सर ज. जी. रुग्णालयात यकृत रोपन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.सर ज. जी. रुग्णालयात विविध विषयांवर आयोजित आढाव बैठकीत ते बोलत होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समुह रुग्णालये, मुंबईची स्थापना – १५ मे, १८४५ झाली. सर जे. जे. रुग्णालयात महाराष्ट्रातुनच नव्हे तर भारतभरातून येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांवर गुणवत्तापुर्ण उपचार होतो. जे. जे. रुग्णालयात १३५२ बेड्स असून, १०० आयसीयु बेड्स आहेत. याठिकाणी रुग्णांना यकृत रोपन सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर मुंबईसह राज्यातील सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सर ज. जी. रुग्णालय -भायखळा येथील आवारात अतिविशेषोपचार रुग्णालयात उपचारासाठी बहुमजली इमारतीच्या बांधकामाची पहाणी करुन ही इमारत नियोजित वेळात पुर्ण करण्यात यावी. बांधकाम गुणवत्तापूर्ण करण्यासाठी दक्ष रहावे. याठिकाणी करण्यात येणाऱ्या सोई- सुविधा दर्जेदार करुन घेण्यासाठी अधिका-यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

ग्रँन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समुह रुग्णालये- मुंबई येथे शल्यचिकित्साशास्त्र विभाग (CVTS) (कार्डिओ व्हॅस्कुलर थोरॅसिक सर्जरी) व कक्षाचे उद्घाटक नुकतेच करण्यात आले आहे. जे. जे. रुग्णालयातील एम. बी. बी. एस. च्या विद्यार्थ्यांसाठी असणारी वसतिगृहे चांगली करण्याची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे. या रुग्णालयाच्या परिसरातील मुलांचे वसतिगृह आणि आर. एम. भट वसतिगृहाच्या डागडुजीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे ही वसतिगृहे बऱ्याच काळानंतर चकाचक होणार असल्याचेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

रुग्णालयात सुरू असलेल्या विविध योजनांचा यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सविस्तर आढावा घेतला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks