ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंमली पदार्थांची खरेदी, विक्री, साठा आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचे आवाहन

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे 

जिल्ह्यात कोणतीही व्यक्ती अगर समुह कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाची खरेदी, विक्री, साठा अगर वाहतुक करीत असल्याचे अथवा सेवन करतानाचे किंवा कोणत्याही अंमली पदार्थांचा बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी उपयोग करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा तशी शक्यता देखील वाटल्यास तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे. संपर्क साधणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येवून माहिती दिल्याबद्दल गोपनीय रित्या बक्षीस देखील देण्यात येणार आहे.

दिनांक २६ जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी भारत सरकारतर्फे २६ जून २०२३ हा दिवस “व्यसन मुक्त भारत (Drug Free India) म्हणून साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातही अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही करण्यात येत आहे.

अंमली पदार्थ व्यसनाधीन व्यक्तीचे समुपदेशन हे समुपदेशन संस्थांद्वारे करण्यात येत असून, अंमली पदार्थ व्यसनाधीन व्यक्तीला समुपदेशन देण्याकरीता पोलीस विभागाशी संपर्क करावा.   याविषयीच्या माहितीसाठी नागरिकांनी कोल्हापूर स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेतील पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे 9420756782, पोलीस हवालदार महेश मनोहर गवळी 8424007543, नियंत्रण कक्ष, कोल्हापूर 0231-2662333, त्वरीत संपर्क नियंत्रण कक्ष, कोल्हापूर 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

अंमली पदार्थ व्यसनाधीन व्यक्तीचे शासनातर्फे औषधोपचार करुन व्यसन मुक्त होण्यास मदत केली जाते. अंमली पदार्थ व्यसनाधीन व्यक्तींस शासनमान्य व्यसनमुक्ती केंद्रामध्ये शासना तर्फे व्यसन मुक्त होण्याकरीता भरती करुन घेतले जाते. तसेच भविष्यात कधीही कोणत्याही प्रकारचे व्यसन करु नये. याकरीता सामुहिक शपथ घेण्यास व त्याचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देवून व्यसनमुक्त राहण्यास आवाहन केले जाते.

कोल्हापूर जिल्ह्यातील व्यसन मुक्त केंद्रे याप्रमाणे आहेत- नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र, आर. के. नगर, कोल्हापूर  व  नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र, सांगाव रोड, कागल, कोल्हापूर. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks