श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलमध्ये स्व.विक्रमसिंह घाटगे जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न ; स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे-

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलमध्ये स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.यावेळी स्पर्धेचे उदघाटन शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी कर्नल एम.व्ही. वेस्वीकर,हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. डी. खोत,प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती जे व्ही चव्हाण यांच्या हस्ते झाले.या स्पर्धेसाठी लहान गट व मोठा गट अशी विभागणी केली होती.या स्पर्धेत जिल्ह्यातील 38 शाळामधील एकूण 88 स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे-
लहान गट-
1)कु.अक्षया रणजितसिंह बावचे-श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल, कागल
2) कु.साक्षी तानाजी पाटील-किसनराव मोरे हायस्कूल, सरवडे
3)कु.हर्षदा आनंदा खापरे-दौलतराव निकम विद्यालय, व्हन्नूर
उत्तेजनार्थ-
1)कु.आर्या दीपक चराटे-लक्ष्मीबाई कृष्णाजीराव जरग वि.मं.कोल्हापूर
2)कु.अनघा उदय सूर्यवंशी-वि.मं.हसूर दु।।
3) कु.गौरी जयदीप मिरगणे -बालाजी माध्यमिक विद्यालय,इचलकरंजी
मोठा गट-
1) कु.प्रतीक्षा सुरेश येरुडकर-शिवाजीराव खोराटे विद्यालय,सरवडे
2)कु.अनुष्का रवींद्र जाधव-किसनराव मोरे हायस्कूल, सरवडे
3)स्वालिया बशीर शेख-करनूर विद्यालय,करनूर
4)कु.पवन शिवाजी शेटे-माध्यमिक विद्यालय, नागाव
5)विश्वजित प्रवीण कांबळे-भाई बी बी पाटील विद्यालय,हसूर दु।।
उत्तेजनार्थ-1)कु.कार्तिक माधव पिंपळे-श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल,कागल
या स्पर्धेचे संयोजन सौ.एस बी सासमिले, सौ.पी आर घाटगे,एम आर मधे यांनी केले.तसेच व्हि एस आनुसे,राजेंद्र भोरे,आर बी भोसले,श्रीमती जे डी चौगुले,एस डी कोपार्डेकर,सौ.एस एस पोवार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.यावेळी पालक,सर्व शिक्षक वर्ग,विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक सौ.एस बी सासमिले यांनी केले.आभार श्रीमती जे व्ही चव्हाण यांनी मानले तर सूत्रसंचालन सौ.पी आर घाटगे व ए एस कांबळे यांनी केले.