मतदार संघातील तीन नगरपालिकांसह सात जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये “शासन आपल्या दारी” उपक्रम प्रभावीपणे राबवू : आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गेल्या ३०-३५ वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात शासनाच्या विविध योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो. यामधून ७० टक्केहून अधिक काम पूर्ण झालेलेच आहे. ऊर्वरीत तीस टक्के लाभ न मिळालेल्या नागरिकांपर्यंत या सर्व योजना पुन्हा नव्या जोमाने नेऊ. “शासन जनतेच्या दारापर्यंत” कसे नेले जाते, हे राज्याला दाखवून देऊ, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. गावागावातील कार्यकर्त्यांनी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून हे अभियान यशस्वी करा, असेही ते म्हणाले.
कागलमधील श्री. शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार श्री. मुश्रीफ बोलत होते.
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, शनिवार दि. २४ पासून या अभियानाला उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघापासून सुरुवात करणार आहोत. कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील सर्व म्हणजे १२४ गावांपर्यंत हा उपक्रम यशस्वी करू. कागल, गडहिंग्लज व मुरगुड ही तिन्ही शहरे तसेच सात जिल्हा परिषद मतदारसंघाच्या ठिकाणी स्वतंत्र हे अभियान राबवू. या अभियानाचा जिल्हा परिषद मतदार संघनिहाय व नगरपालिकानिहाय सविस्तर कार्यक्रम असा……
उत्तुर – शनिवार दि. २४ जून, कडगाव -गिजवणे- शुक्रवार दि. ३० जून, सेनापती कापशी -शनिवार दि. एक जुलै, कागल शहर- सोमवार दि. तीन जुलै, बोरवडे -शुक्रवार दि. सात जुलै, गडहिंग्लज शहर -शनिवार दि. आठ जुलै, नानीबाई चिखली- शुक्रवार दि. १४ जुलै, मुरगुड शहर – शनिवार दि. १५ जुलै, सिद्धनेर्ली -शुक्रवार दि. २१ जुलै, कसबा सांगाव -शनिवार दि. २२ जुलै.
हा उपक्रम राबविताना २० लाखांपर्यंत खर्च आमदार फंडातून करता येणार आहे. त्यासाठीचे पत्र कालच जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार यांना दिल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी कागल विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल विश्वनाथ कुंभार व कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल विकास पाटील यांचे सत्कार झाले.
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, माझी आणि जनतेची नाळ अतूट आहे. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला कागल पंचायत समितीचा सभापती झालो. त्यावेळी “सभापती आपल्या दारी”, त्यानंतर आमदार झाल्यावर “आमदार आपल्या दारी” आणि नंतर “मंत्री आपल्या दारी” ही अभियाने यशस्वीपणे राबवली. त्या माध्यमातून निदर्शनास आलेल्या जनतेच्या अडीअडचणी आणि समस्या मी जवळून बघितल्या. मंत्री पदाचा वापर जनतेसाठीच करीत मी अनेक जनताभिमुख योजना जन्माला घातल्या आणि समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी झालो.
निरीक्षक विश्वनाथ कुंभार, प्रताप उर्फ भैयाबाबा माने, पी. बी. घाटगे, रामगोंडा उर्फ तात्या पाटील, प्रविणसिंह पाटील, किरण कदम, सतीश पाटील, प्रवीणसिंह भोसले, एम. आर. चौगले, शशिकांत खोत, वसंतराव धुरे, वसंतराव यमगेकर, सिद्धार्थ बन्ने, मनोज फराकटे, प्रकाशराव गाडेकर, संजय चितारी, अस्लम मुजावर, जयदीप पोवार, सुर्यकांत पाटील, राजेंद्र माने, नारायण पाटील, बळवंतराव माने, रंगराव पाटील, संजय चितारी नामदेवराव पाटील, विवेक लोटे, संग्राम गुरव, शिरीष देसाई, मारुतीराव घोरपडे, कृष्णात पाटील, अशोकराव नवाळे, प्रवीण काळबर, विवेक लोटे, संजय फराकटे, बाळासाहेब तुरंबे, नितीन दिंडे, डी. एम. चौगले, नवल बोते, बच्चन कांबळे आदी प्रमुखांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत विकास पाटील यांनी केले. प्रास्ताविक विजय काळे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवलेकर यांनी केले. आभार कोल्हापूर बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील यांनी मानले.