ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय रुग्णालयाच्या डीनला टॉयलेट साफ करायला लावणं पडलं महागात ; खासदार हेमंत पाटलांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा !

शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी काल नांदेड येथील रुग्णालयालयला भेट दिली. यावेळी त्यांनी शासकीय रुग्णालयाच्या डीनला टॉयलेट साफ करायला लावले.

या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आल्यानंतर आता खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हेमंत पाटील यांच्यावर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks