ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त शिंदेवाडी येथे विद्यार्थ्यांना वह्या तसेच खाऊ वाटप

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त शिंदेवाडी ता.कागल येथे अभिवादन करण्यात आले.
या निमित्ताने यावेळी श्रीराम विद्या मंदिर शिंदेवाडी तसेच विद्या मंदिर शाहूनगर येथील प्राथमिक शाळेच्या मुलांना वह्या, खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी रामचंद्र खराडे, दत्तामामा खराडे, दगडू माळी, नामदेव शिंदे, गुंडू पाटील, शिवाजी शिंदे, विश्वनाथ वंदुरे, आबासो खराडे, मनोहर आवटे, महादेव खराडे, अशोक खराडे, रामचंद्र कणसे, गणपती गोधडे,गजानन खराडे,के.टी. शिंदे,मारुती सावंत,चंद्रकांत खराडे यांचेसह विद्यामंदिर शिंदेवाडी शाळेच्या शिक्षिका दीपाली कांबळे मॅडम तसेच रोहिणी लोकरे मॅडम उपस्थित होत्या.