ताज्या बातम्यामहाराष्ट्र

60 हजार रुपये लाच मागणारा क्लास वन अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

66 ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण करण्याचे काम दिल्याच्या मोबदल्यात 70 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 60 हजार रुपये लाच मागणारा स्थानिक निधी लेखा परिक्षक कार्यालयातील सहायक संचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. क्लासवन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष हणमंतराव कंदेवार (वय 45 रा. कृष्णकुंज निवास, पाटबंधारे नगर, तरोडा बु. नांदेड, ता. जि. नांदेड) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत 53 वर्षीय व्यक्तीने 13 जुलै 2023 रोजी नांदेड एसीबीकडे तक्रार केली आहे. संतोष कंदेवार हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेखा परिक्षण कार्यालयाचे कार्यालय प्रमुख आहेत. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतीचे सन 2021-22 चे लेखापरिक्षण करुन अहवाल सादर करण्याचे काम तक्रारदार यांना दिले होते.

काम दिल्याचा मोबदला म्हणून सह संचालक संतोष कंदेवार यांनी ग्राम पंचायतीच्या खर्चा नुसार ज्या ग्रामपंचायतीचे खर्च 5 लाख आहे त्यास एक हजार रुपये प्रति ग्रामपंचायत, ज्या ग्रामपंचायतीचे खर्च 10 लाखापर्यंत आहे त्यास दोन हजार रुपये प्रति ग्रामपंचायत व ज्या ग्रामपंचायतीचे खर्च दहा लाखापेक्षा जास्त आहे, त्यास 10 हजार रुपये प्रति ग्रामपंचायत असे एकुण 70 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यानंतर तक्रारदार यांनी नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 13 जुलै रोजी तक्रार केली.
त्यावरुन एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान सह संचालक संतोष कंदेवार यांनी तक्रादार यांना एकूण 70 हजार करुन टाक असे म्हटले. तक्रारदार यांनी काही कमी करा अशी विनंती केल्याने कंदेवार यांनी तडजोडी अंती 60 रूपयाची लाच मागणी दोन पंचासमक्ष केली. लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर कंदेवार यांच्यावर नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक गजानन बोडके
पोलीस अंमलदार राजेश राठोड, ईश्वर जाधव,
सय्यद खदीर, गजानन राउत, मारोती सोनटक्के, प्रकाश मामुलवार यांच्या पथकाने केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks