मुरगुड शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येला आळा घालण्याची नागरिकांची मागणी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड शहराच्या विविध भागांमध्ये कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असेल तब्बल ३० ते ४० कुत्र्यांच्या टोळके नागरिकांच्या वर धावून जात आहेत तसेच दुचाकीचा पाठलाग करत आहेत यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढत आहेत .
मध्यंतरी याबाबत निवेदन दिला असता कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.मात्र त्याची उपायोजना झाली नाही परिणामी कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. आपल्या देशात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दररोज सहा हजारांहून अधिक लोक जखमी होतात, अशी सरकारी आकडेवारी आहे. दररोज सहा हजारांहून अधिक लोक जर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होत असेल तर ती मोठी गंभीर बाब आहे.
शहरांमध्ये जागोजागी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या असतात हे भटके कुत्रे रस्त्यांवरून जाणाऱ्या लोकांवर अचानक हल्ला करतात. विशेषतः शाळकरी मुले, वृध्द, अपंग व महिलांना भटके कुत्रे टार्गेट करतात. दबा धरून बसलेले भटके कुत्रे अचानक घेराव घालून हल्ला करतात. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लोक अक्षरशः रक्तबंबाळ होत आहेत अनेक जण गंभीर जखमी झाली आहेत मध्यंतरी शहरांमध्ये रेबीज झालेल्या भटक्या कुत्र्यांनी अनेक जणांना चावा घेतला होता. इतर शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण नियमित केले जाते तर मुरगूड शहरात ते का केले जात नाही तसेच बेसुमार वाढलेल्या कुत्र्यांच्या संख्येवर नगरपालिका कोणता उपाय करणार आहे,की जीव गेल्यानंतरच यावर प्रशासन जागे होईल असा संतप्त सवाल नागरिक विचारताना दिसत आहेत सध्याच्या घडीला मुरगूड शहरांमध्ये जवळपास 500 ते 600 भटकी कुत्री असल्याचा अंदाज आहे त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे याबाबतचे निवेदन मुरगुडचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांना नागरिकांनी दिले.
यावेळी शिवभक्त समाजसेवक सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, जगदीश गुरव,तानाजी भराडे, संकेत शहा, संकेत भोसले, प्रकाश पारिषवाड, अमर सनगर, शिवाजी चौगले,आनंदा रामाने,संदीप भारमल प्रफुल कांबळे च्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.