ताज्या बातम्यामहाराष्ट्र

खळबळजनक ! पुण्यात ‘एसीपी’कडून पत्नी अन् पुतण्याची हत्या, स्वतःलाही संपवलं

पुण्यात एक खळबजनक घटना घडली असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील बाणेर मध्ये एसीपी ने 44 वर्षीय पत्नी आणि 35 वर्षीय पुतण्याची हत्या करुन स्वतःला संपवले आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस दलात कार्यरत असलेल्या या एसीपीने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. याबाबत माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.

पत्नी मोनी भारत गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून झालेल्या दोघांची नावे आहेत. तर एसीपी भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते.त्यांचे कुटुंबीय पुण्यात बाणेर बालेवाडी परिसरात वास्तव्याला होते.हत्येनंतर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, या घटनेचे कारण अद्याप समोर आले नसून चतु:शृंगी पोलीस
घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks