ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी घेतले निडसोशी मठाचे दर्शन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी निडसोशी मठाला भेट देवून दर्शन घेतले. यावेळी मठाचे मुख्य मठाधिपती स्वामी श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी आणि उत्तराधिकारी श्री. निजलिंगेश्वर महास्वामीजी यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांना आशीर्वाद दिले.

यावेळी नीडसोशी मठाचे मुख्य मठाधिपती श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी म्हणाले, “मुश्रीफसाहेब………, गोरगरिबांच्या सेवेची पुण्याई सदैवच तुमच्या पाठीशी आहे. तुमची आणि गोरगरिबांची नाळ घट्ट असल्यामुळेच पुन्हा तुम्हाला गोरगरिबांच्या सेवेचेच विशेष सहाय्य खाते मिळाले आहे. गोरगरिबांची सेवा तुमच्या हातून निरंतरपणे घडो……..!

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर, उदयराव जोशी, गोडसाखर कारखान्याचे संचालक प्रकाशभाई पताडे, सोमगोंडा आरबोळे, रमेश रिंगणे, विठ्ठल भमाणगोळ, चंद्रकांत सावंत, एम. एन. कोल्हापुरे, सुरेशआण्णा कोळकी, अरविंद कित्तुरकर, अण्णासाहेब देवगोंडा, रमेश पाटील, राकेश पाटील, राजन दड्डी, राहुल शिरकोळे, अमर मांगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks