ताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत भर पावसात सहा हजार हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; कागल,मुरगूड, सेनापती कापशी व कणेरी अशा चार केंद्रावर एकाचवेळी स्पर्धा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

श्री शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७५व्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत 6,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व श्री छत्रपती शाहू कला,क्रीडा,व सांस्कृतिक मंडळ कागल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा झाल्या.

कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर,मुरगुड येथे मुरगुड विद्यालय,सेनापती कापशी येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालय व करवीर तालुक्यातील कणेरी येथील काडसिद्धेश्वर विद्यालय अशा चार केंद्रावर या स्पर्धा एकाच वेळी झाल्या. पहिली ते तिसरी, चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी,आठवी ते दहावी, मूकबधिर पहिली ते चौथी व मतिमंद अशा सहा स्वतंत्र गटात या स्पर्धा झाल्या. परीक्षक म्हणून रावसाहेब शिंदे नागेश हंकारे अनिल अहिरे पद्माकर कुलकर्णी यांनी काम पाहिले

यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने 2002 पासून या स्पर्धा घेण्यात येत आहेत. या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडत आहेत. सुरुवातीला फक्त कागल केंद्रावर होणाऱ्या या स्पर्धा पालक व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आता कागलसह मुरगूड,सेनापती कापशी व करवीर तालुक्यातील कणेरी अशा चार केंद्रावर घेण्यात येत आहेत.या स्पर्धेमुळे बालचित्रकारांना व्यासपीठ मिळत आहे.

यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक व यशवंत उर्फ बाॕबी माने यांनी आपल्या प्रास्ताविकात स्व. राजे साहेब यांच्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त त्यांचे विचार व कार्य याचा आढावा घेतला.यावेळी संचालक सचिन मगदूम, भाऊसाहेब कांबळे ,शाळेचे प्रशासन अधिकारी वेस्विकर आदी उपस्थित होते.

आभार मुख्याध्यापक एसडी खोत यांनी मानले. सुरुवातीला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले.स्पर्धेचे उदघाटन दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks