ताज्या बातम्यामहाराष्ट्र
महाराष्ट्राला पुढील चार – पाच दिवस येलो अलर्ट ; मच्छीमारांसह शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

पुणे प्रतिनिधी :
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यातच महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. काल राज्यात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली होती.
त्यातच आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सिंधूदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूही झाल्या आहेत.