संस्कारक्षम पिढी घडविण्यात शिक्षकांचे मोलाचे योगदान : श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे; राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीमार्फत शिष्यवृत्ती सराव परीक्षा.

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
संस्कारक्षम पिढी घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे असे प्रशंसोदगार शाहू साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी काढले.
येथील महालक्ष्मी हायस्कुलमध्ये राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने घेतलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या उदघाटनवेळी त्या बोलत होत्या.
शाहू साखर कारखान्याच्या चेअरमनपदी श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांची निवड झाल्याबद्दल सरपंच सौ.छायाताई हिरुगडे यांच्या हस्ते ग्रामस्थांच्यवतीने सत्कार केला.
शिष्यवृत्ती परीक्षेचे हे सलग पंधरावे वर्ष आहे.कागल करवीर, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील ३६ केंद्रावर ६ हजार २०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.यापूर्वी फक्त पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेतली जात होती. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा राजे फाउंडेशन मार्फत या वर्षीपासून पहिल्यांदा घेतली जात आहे,अशी माहिती यावेळी संयोजकांनी दिली.
श्रीमती घाटगे पुढे म्हणाल्या,विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा. या दूरदृष्टीने स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी सुरु केलेली ही शिष्यवृत्ती सराव चाचणी परिक्षा गेली १५ वर्षे सुरु आहे.राजेंच्या निधनानंतर ही परंपरा समरजितसिंह यांनी अखंडीतपणे सुरु ठेवली आहे. या शिष्यवत्ती सराव चाचणीचा फायदा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना होत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. राजर्षि छत्रपती शाहूंच्या विचाराची गंगा खेडोपाडी पोहोचवण्याची धडपड ही स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे, यांचे पासून आता समरजितसिंह चालवित आहेत. असेही त्या म्हणाल्या.
यावेळी राजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील,शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, माजी उपसरपंच प्रताप पाटील, यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाहूचे संचालक डी.एस पाटील, सचिन मगदूम, संचालिका रेखाताई पाटील, बाळासाहेब गुजर, राजश्री चिंदगे, महादेव किल्लेदार, विलास अस्वले, दता घराळ, आकाश पाटोळे, तानाजी पोवार, संजय पाटील, संतोष हिरुगडे, मेजर शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
स्वागत मुख्याध्यापिका प्रभावती पाटील यांनी केले. तानाजी पाटील यांनी आभार मानले.
शिक्षकांमुळे कागल आग्रेसर
श्रीमती घाटगे यांनी कागल तालुका शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे.शिष्यवृत्तीत चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. शिक्षक व शिक्षण विभागाच्या परिश्रमामुळे हे शक्य झाल्याने त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.असे प्रतिपादन श्रीमती घाटगे यांनी केले.