वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा

कौलव प्रतिनिधी :
समाजामध्ये आपण पाहतो कि वाढदिवस म्हटलं की लहानपणापासून ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत अगदी सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. आजकाल तर वाढदिवस साजरा करणे ही एक फॅशनच झाली आहे. अवघ्या पाच मिनिटांसाठी वाढदिवसाच्या माध्यमातून हजारो रुपये उडवले जातात, पण या सर्व गोष्टीं ना फाटा देत पिंपळवाडी बरगेवाडी ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर सुमित जाधव यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५० झाडे लावून समाजसमोर एक वेगळा आदशं ठेवला आहे.
आज कोरोना सारख्या महाभयंकार महामारी रोगाच्या काळात आॕक्सिजनची कमतरता भासु लागली तसेच बेसुमार वृक्षतोढ झाल्याने पाऊसाची अनियमित्ता झाली आहे यासाठी वृक्षारोपन करणे काळाची गरज असल्याने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन प्रत्येक मित्राला एक झाड याप्रमाणे ५० जंगली झाडे लावण्याचा उपक्रम केला आहे. प्रत्येक मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वूक्षारोपन करणार असलयाची प्रतिक्रिया सुमित जाधव यांनी दिली आहे.
या उपक्रम वेळी माजी सरपंच सुभाष जाधव, अमित पोपले, आशोक जाध, संतोष जाधव, युवराज जाधव, मानसिग पाटील राहूल काका व मित्र परीवार उपस्थित होते.