सहकार बळकट करण्यासाठी एकदिलाने काम करूया : राजे समरजीतसिंह घाटगे ; गोकुळ शिरगाव येथे राजे बँकेच्या नूतन शाखेचे उद्घाटन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राष्ट्रीयकृत बँका मोठ्या कर्जदारांच्या शोधात असतात. मात्र ग्रामीण भागात सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या छोट्या बँका लहान-लहान कर्जदारांना कर्जपुरवठा करून कर्जदारांसोबत बँकेलाही अर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सहकार संस्थांच्या माध्यमातून सहकार बळकट करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करूया असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी केले.
राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑफ- बँक लि. कागल या बँकेच्या 11 व्या शाखेचा गोकुळ शिरगाव(ता.करवीर) येथे उद्घाटन समारंभ संपन्न झाला.त्याप्रसंगी ते बोलत होते. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या शुभहस्ते या नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या शुभहस्ते ” मोबाईल बँक ” या बँकेच्या अद्ययावत सेवेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी केले .
पहिल्याच दिवशी राजे बँकेच्या या नूतन शाखेत 50 लाख रु.च्या. ठेवी ठेवून बँकेवरील विश्वास दृढ केला. प्रातिनिधिक स्वरूपात ठेवीदारांना ठेवपावतींचे वितरण करण्यात आले. तर मीनाक्षी संतोष पाटील (गो.शिरगाव),सचिन शिवाजी पाटील (उंचगाव), अनुराग जयवंत चौगुले (गो.शिरगाव) यांना कर्ज मंजुरीच्या पत्रांचे वाटपही करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. घाटगे म्हणाले, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजे बँकेच्या नवीन शाखा मंजूर करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे.आज स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेल्या आदर्शवत पारदर्शक कारभाराचा वस्तूपाठ नजरेसमोर ठेवून राजे बँकेचा कारभार सुरू आहे.येत्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या योजना या राजे बँकेच्या माध्यमातून राबवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे श्री.घाटगे यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार विजय कदम यांना ” आचार्य अत्रे ” पुरस्कार मिळाल्याबद्दल राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाहूचे संचालक शिवाजीराव पाटील,संजय नरके,माजी संचालक एम. एस. पाटील, राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव,आप्पासो भोसले,आप्पासो हुच्चे,टि.के. पाटील,शंकरराव पाटील, माजी.जि. प. उपाध्यक्ष शशिकांत खोत,अनिल नाईक, दलितमित्र अशोकराव माने, उपसरपंच संगीता शिवाजी गवळी यांच्यासह बॅंकेचे सर्व संचालक, शाहू कारखान्याचे आजी-माजी संचालक ,शाहू दुध संघाचे आजी माजी संचालक,कार्यकर्ते,सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर यांनी मानले.
पारदर्शक कारभाराला प्राधान्य……..
स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी सहकार संस्थांमध्ये घालून दिलेली आचारसंहिता डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. आज आमचे विरोधक सहकारातील एकाही आदर्शवत संस्थेचे संस्थापक नाहीत,मात्र आम्ही आमच्या संस्था आदर्शवत व पारदर्शीपने चालवल्या आहेत. समाजकारणात काम करतात यापुढेही आम्ही पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणार आहोत.