ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार अपात्रता प्रकरणात पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार

14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी दुसरी सुनावणी आज (25 सप्टेंबर) विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. आज झालेल्या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. यावेळी ठाकरे गटाकडून अनिल परब, अनिल देसाई, सुनील प्रभू यांच्यासह मुंबईतील आमदार उपस्थित होते. शिंदे गटाकडून अनिलसिंह साखरे यांनी बाजू मांडली.

एकत्रित सुनावणीवर निर्णय नाहीच, पुढील सुनावणीत निर्णय
आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून सर्व दाखल 34 याचिका एकत्रित करून सुनावणी करा, अशी मागणी करण्यात आली. सर्व दाखल 34 याचिका एकत्रित का केल्या जात नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली. मात्र, सर्व याचिकांची एकत्रित सुनावणीला शिंदे गटाच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. शिंदे गटाचे वकील अनिलसिह साखरे यांनी सर्व याचिका एकत्रित नको, स्वतंत्र सुनावणी घ्या, असा युक्तिवाद केला. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पुढील सुनावणी कोणत्या पद्धतीने होईल, याबाबत वेळापत्रक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सादर करणार आहेत. ठाकरे गटाकडून सातत्याने मागणी करण्यात येत असलेल्या सर्व याचिकांच्या एकत्रित सुनावणीवर 13 तारीखला सुनावणी होणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks