भारतीय जनता पार्टी पन्हाळा तालुका अध्यक्षपदी मंदार परितकर यांची निवड.

कळे -वार्ताहर अनिल सुतार
भाजपने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची तयारी वेगाने हाती घेतली आहे. त्यासाठी पक्षाने राष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंत पदाधिकारी बदल केले आहेत.काही दिवसांपूर्वी पक्षाने कोल्हापूरातील सर्व तालुक्यांच्या तालुकाध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी निवडीकरिता जिल्हा पक्ष कार्यालयात मुलाखती घेतल्या होत्या.
पन्हाळा तालुक्यातून इच्छुकांची मोठी संख्या होती. त्यातून पन्हाळा तालुकाध्यक्ष पदी मंदार परितकर यांची निवड झाली आहे.नामदार चंद्रकांतदादा पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थित जिल्हाध्यक्ष राहुलदादा देसाई यांनी त्यांना निवडपत्र दिले.नूतन तालुकाध्यक्ष मंदार मारुतीराव परितकर यांच्या निवडीमुळे पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला असून त्यांच्या निवडीनंतर पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. परितकर यांच्या निवडीनंतर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
परितकर कुटुंबीय गेली 30 वर्षे पक्षाच्या विचारधारा व कार्याशी एकनिष्ठ असून पक्षाचे जेष्ठ नेते के.एस.चौगले,राजाराम शिपुगडे,बाळासाहेब भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मारुतीराव परितकर मोरेवाडी ता . पन्हाळा यांनी पश्चिम पन्हाळ्यामध्ये पक्ष विस्तारासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत.
नूतन तालुकाध्यक्ष मंदार परितकर हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून यापूर्वी ते पक्षाचे सरचिटणीस होते, त्यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची पोचपावती म्हणून पक्षाने त्यांची निवड केलेली आहे. तसेच आजतागायत त्यांनी पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडत यशस्वी कामगिरी केली आहे.
तालुकाध्यक्ष पदाचा वापर करून तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करणे , तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुती च्या राज्यातील सरकारच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे मंदार परितकर यांनी सांगितले.
या निवडीसाठी माजी आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, मा .जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे,सत्यजित नाना कदम,राजवर्धन नाईक निंबाळकर,विजय जाधव,राहुल चिकोडे,अजय चौगले, विजेंद्र माने यांचे सहकार्य लाभले.