शिवराज्याभिषेकचे अवचित्य साधून करवीर शिवसेनेच्या वतीने उंचगाव ग्रामपंचायतीस शिवराज्याभिषेक सोहळ्याचे छायाचित्र ग्रामविकास अधिकारी अजित राणे यांना केले प्रदान

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शिव स्वराज्य दिन या निमित्त महाविकास आघाडी सरकारने राज्यभर शासकीय पातळीवर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक हा शिव स्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोरोना प्रतिबंधक विषयी नियमांचे पालन करुन राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीं मध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडून १ जानेवारी २०२१ च्या परिपत्रकानुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत. भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून त्यास अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत या गायनातून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर करवीर शिवसेनेच्या वतीने उंचगाव ग्रामपंचायतीस शिवराज्याभिषेक सोहळ्याचे छायाचित्र ग्रामविकास अधिकारी मा.अजित राणे यांना देण्यात आले. तसेच अन्य जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसह शासकीय-निमशासकीय कार्यालये, सामाजिक संस्था यांना हवे असतील तर आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव,उपतालुकाप्रमुख दिपक पाटील, बाळासाहेब नलवडे,युवासेना उपतालुका अधिकारी प्रफुल्ल घोरपडे, युवासेनेचे सचिन नागटीळक.