ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते खासदार संजयदादा मंडलिक यांचा सत्कार

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते बँकेचे संचालक खासदार संजयदादा मांडलिक यांचा सत्कार झाला. सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आमदार श्री. मुश्रीफ यांनी खासदार श्री. मंडलिक यांचा हा सत्कार केला
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार पी. एन. पाटील, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार डॉ. राजेंद्र पाटील -यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, सौ. स्मिता गवळी आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.