ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र

Kolhapur News: अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या; विष पिऊन गळ्यावर ओढली सुरी

Kolhapur santosh shinde suicide : कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योगपती संतोष शिंदे यांनी त्यांची पत्नी आणि मुलासह शुक्रवारी विष प्राशन करून गळ्यावर सूरी ओढून आत्महत्या केली.

कोल्हापूर :

कोल्हापुरातील मोठे उद्योजक तसेच गडहिंग्लज येथील अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे शिंदे यांनी त्यांची पत्नी आणि मुलासह शुक्रवारी रात्री विष प्राशन केले. यानंतर गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. त्यात काय लिहिले आहे, हे पोलिसांनी जाहीर केलेले नाही. यातुन त्यांच्या आत्महत्तेचे खरे कारण पुढे येणार आहे. त्यांच्या आत्महत्तेमुळे गडहिंग्लज तालुक्यात खळबळ उडाली आहे. संतोष शिंदे यांनी कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत मोठे समाजकार्य केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष शिंदे हे त्यांच्या घरी होते. त्यांच्या बेडरूमचे दार आतून बंद होते. आज सकाळी त्यांनी सकाळी दरवाजा उघडला नाही. त्यांच्या आईने त्यांना हाका मारल्या. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या आईने शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी बेडरुममध्ये तिघांचेही मृतदेह आढळून आले. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे.

या घटनेनंतर गडहिंग्लज शहरावासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks