ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड ता. कागल येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये दि.20,21 व 22 मार्च 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.

यामध्ये दि. 21 रोजी पारंपारिक वेशभूषा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा पार पडल्या. या पारंपारिक वेशभूषा स्पर्धेमध्ये बी. सी. ए. विभागाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर स्क्वाड ग्रुप व रॉयल ग्रुप यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये संदेश सोनाळकर ग्रुप यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच श्री गणेश गुरव व संकेत किल्लेदार यांनी द्वितीय क्रमांक तर प्रतीक्षा परीट हिने तृतीय क्रमांक मिळवला.

दि.21 मार्च 2025 रोजी शाहीर रणजीत कांबळे यांचा हास्य जत्रा हा विनोदी कार्यक्रम सादर करण्यात आला तसेच याच दिवशी शेलापागोटे हा कार्यक्रम घेण्यात आला.

दि. 22 मार्च रोजी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा. अँड वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पारंपारिक वेशभूषा व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक साळुंखे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे होते.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद प्रधान यांनी केले. या स्नेहसंमेलनात सर्व विद्यार्थी प्राध्यापक उत्साहाने सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks