ममता बॅनर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा : भाजपा तालुकाध्यक्ष महेश मोरे

कोल्हापूर :
नुकत्याच मुंबई दौऱ्यावर असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका कार्यक्रमावेळी राष्ट्रगीताच्या ४-५ ओळी उच्चारून राष्ट्रगीत अर्धवट सोडून अवमान करत देशाचा अपमान करत निघून गेल्या. या शिवाय ममता बॅनर्जी यांनी आपल्या कृतीमुळे गृहमंत्रालयाच्या २०१५ सालाच्या आदेशाचा भंग केला आहे.
ज्या आदेशान्वये राष्ट्रगीत चालू असताना नागरिकाने सन्मानजनक स्थितीत उभे राहावे असे निर्देशित केले असताना देखील मुख्यमंत्री पदावरील जबाबदार व्यक्तीकडून असे बेजबाबदार कृत्य अशोभनीय तसेच पदाला बाधा आणणारे आहे.तरी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात Prevention of insult to National Honors act 1971 कलम 3 च्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा असे निवेदन कोल्हापूर दक्षिण मंडल भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली करवीर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठलराव पाटील,भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, जिल्हा भाजपा ओबीसी आघाडीचे सरचिटणीस शरदजी महाजन,अनुसूचित जातीचे उपाध्यक्ष गजेंद्र हेगडे उपस्थित होते.