विद्या मंदिर मजरे कासारवाडा यांच्या वतीने पादयपूजन सोहळा ; सिद्धगिरी संस्थान कणेरी मठाच्या विदयाचेतना प्रकल्पांतर्गत यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळा

बिद्री प्रतिनिधी :
सिद्धगिरी संस्थान कणेरी मठाच्या विदयाचेतना प्रकल्पांतर्गत विद्या मंदिर मजरे कासारवाडा येथे पादयपूजन सोहळा आयोजन करण्यात आला होता. मुलांच्यात संस्कारक्षम गुण निर्माण व्हावेत या स्वामीजींच्या संकल्पनेतून जिवंतपणे आई वडिलांचे पाद्यपूजन व्हावे, यासाठी विदयाचेतना प्रकल्पाची स्थापना करण्यात आली.
मुलांच्या जीवनात आई वडिलांचे स्थान महत्वाचे मानले जाते. त्यांच्या पाद्यपूजनाने मुलांना आई वडिलांप्रती प्रेम, आदर निर्माण व्हावा यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या संकल्पनेतून शाळेच्या स्थापनेपासून सर्वांत प्रथमच वि. मं. मजरे कासारवाडा या शाळेत पाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल कुदळे, शिक्षक सातापा शेरवाडे, रुपाली कुदळे, मेघा फराकटे, डायट अधिव्याख्याता सरिता कुदळे मॅडम, सरपंच योगिता वारके, उपसरपंच संजय सुतार, शाळा समिती अध्यक्ष सचिन तौंदकर, उपाध्यक्ष महेश वारके, युवराज वारके, सचिन वारके, कणेरी मठाचे प्रकल्प प्रमुख पी. एस. जाधव, जिल्हा समन्वयक राजेंद्र शिंदे, राधानगरी तालुका समन्वयक पांडुरंग पाटील, शिक्षक मित्र युवराज पाटील , संग्राम कदम, प्रियांका पाटील, शुभांगी पाटील यांच्यासह गावातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.