पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोल्हापूरला एकदिवशीय उपोषण

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनामध्ये मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची मर्यादा 50 हजारावरुन पाच लाखापर्यंत करावी, समाज कल्याणची कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजना प्रभावीपणे राबवावी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेमधील जमिनीचा विभागवार बाजार भाव निश्चित करावा, लाभार्थ्याला जिल्ह्यात कुठेही जमीन घेता यावी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे आरबआयचे लायसन नूतनीकरण करून महिलांना पाच लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी द्यावे, लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशीसाठी निधीची तरतूद करावी या व अशा अनेक मागण्या करण्यात आले आहेत.
सदर आंदोलनामध्ये कोल्हापूर जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष मुसा (भाई) मुल्ला, वरिष्ठ जिल्हाध्यक्ष संभाजी चौगुले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल सोनावळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा (वरिष्ठ )राधा कांबळे, कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष पार्वती आडसूळ, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख दीपक शिंगे, कागल तालुका अध्यक्ष जयश्री चव्हाण,पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुख शोभा पारधे, पश्चिम महाराष्ट्राचे(वरिष्ठ) उपाध्यक्ष प्रकाश वायदंडे ,अनिकेत चव्हाण ,शहनाज नदाफ, माधुरी सलगरे, कोमल भोरे, निवास भोरे ,संदीप येलगारे, अनिकेत चव्हाण, तुकाराम वायदंडे ,आरती शिंगे ,काजल हेगडे ,मोनिका सोनुले, सारिका आकुर्डे, पूजा तांबे, अश्विनी सोनुले ,आरती शिंदे, शोभा शिंदे, सायरा मुल्ला, संदीप पगारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. सदर मागण्या दहा दिवसाच्या आत मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा देण्यात आला आहे.