ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडमध्ये बोगस खत विक्री ; कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकून खताचे नमुने घेतले तपासणीसाठी

निकाल न्यूज : विजय मोरबाळे

मुरगूड येथील जयकिसान जंक्शन या दुकानातील एमओपीमध्ये (पोटॅश) मीठ व युरियाची भेसळ असल्याचे निदर्शनास आल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकून खताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

शेतकरी चंद्रकांत एकनाथ बरकाळे यांनी तालुका कृषी अधिकायांकडे तक्रार केली होती. त्यावरून तीन अधिकायांच्या पथकाने या दुकानाची तातडीने कसून चौकशी केली.

बरकाळे यांनी याच महिन्यात या दुकानातून युरिया १ बॅग आणि एमओपी २ बैंग खरेदी केल्या होत्या. यातील एमओपी मध्ये मीठ आणि युरिया भेसळ असल्याची शंका आल्याने त्यांनी खरेदी बिलाच्या झेरॉक्ससह तालुका कृषी अधिकायांकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी सुशांत लवटे, जिल्हा गुणवत्ता व नियंत्रण निरीक्षक संभाजी शेणवे या अधिकायांच्या पथकाने संबंधित मालाची कसून तपासणी करत नमुने ताब्यात घेतले. आणि तपासणी अहवाल येईपर्यंत संबंधित दुकानातून एमओपी विक्रीला बंदी घातली. तपासणीसाठीचा नमुना कोल्हापूरच्या लॅबकडे पाठवल्याचे सांगितले.

खासगी कंपन्या सरकारकडूनं सबसिडी उचलतात तर दुसऱ्या बाजूला ३०० रुपयेचा युरिया पोटॅश पावडरच्या रुपात १६०० ते १७०० रुपयेला विकून मालामाल होतात. तसेच शेतकऱ्याला लिंकिंगच्या माध्यमातून नको असणारी खते देतात. यात एखादया शेतकयांने ही भेसळ उघडकीस आणल्यास आणि त्यातूनही तक्रार झाली तर मॅनेज करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा या बड्या कंपन्याकडे तयार असते. त्यामुळे तात्पुरती कारवाई केल्याचा दिखावा केला जातो. यात गोरगरीब लाखो शेतकयांना राजरोसपणे लुबाडले जात आहे. पिकाला पुरेसा हमीभाव नाही आणि त्यात खताच्या रूपाने होणारी लुबाडणूक थांबणार तरी कधी ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांचा पंधरावड्यानंतर उपलब्ध होणारा तपासणी अहवाल काय असणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks