वाळवे खुर्द येथील आदेश पाटील यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड

बिद्री प्रतिनिधी :
कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आदेश रमेश पाटील यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील होते. त्याचबरोबर अनिल साळुंखे,सनी मनकर, सुहास कदम, निहाल कलावंत आदी उपस्थित होते. ए वाय पाटील यांच्या हस्ते यांना निवड पत्र देण्यात आले. यावेळी आदेश पाटील यांनी येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे विचार जिल्ह्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले. आगामी राजकारणात वाळवे खुर्द येथील रमेश पाटील गटाला आदेश पाटील यांच्या रूपाने न्याय दिला जाऊ शकतो. या निवडीसाठी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, बिद्री साखर चे संचालक गणपतराव फराकटे माऊली दूध संस्थेचे संस्थापक रमेश पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले.