ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.

जयंत सावरकर यांच्या निधनानंतर चाहत्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. गेल्या चार दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

जयंत सावरकर हे 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. जयंत सावरकर हे रंगकर्मी असण्यासोबत मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजमध्येही ते झळकले आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks