ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूडच्या हजरत गैबी पीर उरुसाला बुधवारपासून प्रारंभ

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथील हजरत गैबी पीर उरूस १५ ते १९ जानेवारी अखेर विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. यामध्ये बुधवारी (ता. १५) सायंकाळी ६ वाजता संदल मिरवणूक, रात्री ९ वाजता शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन, गुरुवारी (ता. १६) भर उरूस, सकाळी ९ वाजता उरूस समितीतर्फे गलेफ, नैवेद्य अर्पण, तर रविवारी (ता. १९) रात्री ९ वाजता ‘ऑर्केस्ट्रा वैभव डान्स मुझिकल नाईट’ यांचा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उरूस समितीचे अध्यक्ष अमित भोई, उपाध्यक्ष समाधान दरेकर व सदस्यांनी केले आहे.