शिवकालीन ‘होन’च्या साक्षीने साजरा होणार यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा; संभाजीराजें

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
दोन दिवसांपूर्वी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून खासदार संभाजीराजे यांनी शिवभक्तांशी संवाद साधला होता. शिवराज्याभिषेक दिनासाठी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रायगडावर गर्दी न करण्याचं आवाहन संभाजीराजेंनी यावेळी केलं होतं. कोरोनामुळे यंदा शिवभक्तांचं प्रतिक म्हणून मी रायगडावर जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. रविवारी हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे.
यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन ‘होन’ च्या साक्षीने साजरा होणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होन हे चलन वापरात होतं. स्वराज्याची दुसरी राजधानी असलेल्या रायगडावर अनेक वर्ष शिवाजी महाराजांचं वास्तव होतं, त्या ठिकाणी अनेक ऐतिहासिक वस्तु पुरात्व विभागाला मिळाल्या आहेत.
स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारा ‘होन’ हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे. राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या ऐतिहासिक ‘होन’च्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.
दरम्यान, संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी सरकारसमोर 5 प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. याशिवाय त्यांनी स्वतंत्र राजकिय पक्ष काढण्याबाबत देखील संकेत दिले होते. आता यावर काय निर्णय घेतील याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.