मुरगुड : पालकमंत्री नाम.हसन मुश्रीफ यांनी केले खुल्या सभागृहाच्या कामाचा शुभारंभ

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता.कागल येथील शिवाजी विद्या मंदिर शाळा नं -२ या शाळेच्या खुल्या सभागृहासाठी दहा लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.या सभागृह बांधकामाचा शुभारंभ महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगुड चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते.
यावेळी नाम. हसन मुश्रीफ यांनी, शाळेच्या वाढलेल्या पट संख्येबाबत कौतुक केले,तसेच शाळेतील उर्वरित कामासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही असे जाहीर केले.
यावेळी शाळेच्या वतीने नाम. हसन मुश्रीफ, प्रविणसिंह पाटील, दिग्विजय पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप घार्गे गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकरसो, ऍड.सुधीर सावर्डेकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राजू आमते,सुनील चौगुले, शिवाजी सातवेकर ,शाळा समितीचे अध्यक्ष विजय मेंडके,अमर चौगले,रणजित भारमल,युवराज गुजर,रणजित डोंगळे,रेणू सातवेकर,मेघा डेळेकर ,अश्विनी गुरव, सीमा उपलाने, सुप्रिया भोसले, प्रशांत मोरबाळे,मुख्याध्यापक आंगज यांचेसह शिक्षक,पालक,ग्रामस्थ,विदयार्थी उपस्थित होते.